बालभवन शाळेत महिलादिन संपन्न

दिएन्युकेशन सोसायटी, अंबरनाथ अंबरनाथ :जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून बालभवन मराठी प्राथमिक शाळा येथील बालभवन मराठी प्राथमिक शाळेत पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कीर्तनकार ज्योत्स्ना गाडगीळ प्रमुख पाहण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या रसाळ शैलीत कीर्तनकार ज्योत्स्ना गाडगीळ यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. संसार रथाचे एक चाक म्हणजे स्त्री, ती सक्षम असेल तर जगाचा उद्धार करू शकेल आणि त्याची सुरुवात आपल्या मुलांवरील संस्कारांतूनच होईल असे प्रतिपादन गाडगीळ यांनी केले. या प्रसंगी शाळाबाह्य स्पर्धाम ये चमकदार कामगिरीने शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या विद्यार्थिनींचे शाळेकडून कौतुक करण्यात आले. मेंदी, आणि गायन स्पर्धातील विजेत्या महिलांना गौरविण्यात आले. या गुणगौरवानंतर विविध क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या भारतीय महिलांचा परिचय अतुला भावे यांनी चित्रफितीद्वारे करून दिला. शाळेतील शिक्षिका तसेच पालकांनी विविध कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांविषयी पालकांनी आपल्या मनोगतात आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक सुवर्णा करंजुले यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय जयश्री बोरसे यांनी करून दिला. अलका पारधी यांच्या गीतगायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. मोठ्या संख्येने पालकवर्ग तसेच शालेय समितीच्या वर्षा प्रभुदेसाई, स्नेहल शूर्पाली, कार्यक्रमास उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका मंजिरी आठवले यांचे मार्गदर्शन आणि सर्व शिक्षिकांचे सहकार्य लाभले.