"कोरोना" वायरसविषयी सतर्कता बाळगणे गरजेचे !

कोरोना व्हायरस आपलं डोकं दिवसेंदिवस वर काढत असल्याने जगभरातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यात यावर कोणताही उपाय अजून मिळाला नसल्याने अधिक चिंता वाढली आहे. 'कोरोना' व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही. __ वैज्ञानिकांच्या मते, हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे. सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्त्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही. ___या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली.या संसर्गाची सुरुवात चीनम |पल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे.थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याचीशक्यता जास्त आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असं गरजेचं नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत, असं नाही. चीनव्यतिरिक्त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.


माणसाला संसर्ग करणारया आणि विशेषत: पहिल्यांदाच संसर्ग करणारया प्रत्येक विषाणविषयी चिंता करायला हवी, कारण जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या विषाणुचा फैलाव होतो तेव्हा तो कसा रोखायचा, त्यावर कोणते उपचार आहेत, हे सगळं जाणून घेण्यात बराच वेळ जात असतो. आपण आपल्यापरीने ह्याची काळजी घेऊ शकतो आणि काही उपाय करू शकतो. आपले हात दिवसातून अनेक वेळा साबण, कोमट पाणी आणि अल्कोहलयुक्त हॅन्ड सेनेटायझरने स्वच्छ करावे. तोंडाला मारक लावावे. चांगल्या मास्कचा वापर करावा. घरातून निघण्यापूर्वी मास्क लावूनच निघावे. आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये. प्राण्यांपासून लांब राहणे,मीटचे सेवन करणे टाळावे. गरज असल्यास घरातून बाहेर जाणे. संक्रमित व्यक्ती पासून लांब राहणे. बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करणे. सर्दी खोकल्याने संक्रमित व्यक्तींच्या जवळ न जाणे.सडके आणि शेतात प्राण्याच्या संपर्कात न जाणे. भरपूर विश्रांती घेणे. भरपूर पेय घेणे. तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घेणे. लहान मुलांना एस्परिन देणे टाळावे. त्वरित डॉक्टरला दाखवणे. मनाने कोणतेही औषध गोपचार घेणे टाळावे. औषधे चिकित्सकांच्या परामर्शानुसारच घ्यावे. काही हजार नागरिकांचे बळी आणि रुग्णालयात उपचार घेत असणारे हजारो लोक याची चीनला चिंता आहेच. 'कोरोना' व्हायरस आणि नव्याने उद्भवलेल्या 'बर्ड फ्लू'मुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चीनपुढे उभे ठाकले आहे. चीनमध्ये पहिल्यांदा आढळून आलेला 'कोरोना' व्हायरस आता जगभरातल्या अनेक देशांमध्ये पाय पसरू लागला आहे. 'कोरोना' व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडणा-यांची संख्या चीनमध्ये झपाटयाने वाढत आहे. जगभरात इतरही देशांमध्ये या विषाणूंची लागण होऊन नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे जगभरातल्या नागरी जीवनावर 'कोरोना' विषाणू परिणामकारक ठरतोच आहे. सध्या तरी या कोरोना वायरसविषयी सतकर्ता बाळगणे हेच उत्तम दिसून येत आहे.