जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित अल अदिल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्या उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतुन नवोदित उद्योजकांना प्रेरणा मिळावीया उद्देशाने शाश्वत गुपच्या वतीने व चिंतामणी क्रिएशन्स यांच्या संकल्पनेतून बदलापुरात उद्योगसंध्या अंतर्गत मसाला किंग आठवणींचा प्रवास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. धनंजय दातार यांनी त्यांच्या उद्योग क्षेत्रातील रोमांचक व प्रेरणादायी आठवणींना उजाळा देत तरुण उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.दातार यांनी उद्योजकांना उद्योग व्यवसायातील यशाची गमके सोप्या भाषेत समजावून सांगितली. ते म्हणाले की, अशिक्षित माणूसही धंदा व्यवसाय करू शकतो. दुबईमध्ये असे कितीतरी व्यवसायिक आहेत. ज्यांना साधं चेकवर लिहिता पण येत नाही पण संख्या ओळखता येते. कोणीही माल खरेदी करू शकतो, पण माल विकणे ही कला आहे. त्यामुळे धंदा व्यवसाय करणाऱ्या माणसामध्ये सेल्समनशिप असली पाहिजे,असे ते म्हणाले.ठरविक समाजाचे लोकच व्यवसाय करू शकतात, हा न्यूनगंड न बाळगता व्यवसाय केला पाहिजे.देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीचा कसा वापर करतोय ते आपल्या हातात आहे. मी दुबईला गेलो तेव्हा मला काही येत नव्हतं इंग्लिश बोलायला येत नव्हतं अरबी येत नव्हते. पण मी ते शिकलोआयुष्यात कधीही लाजलो नाही,स्वतगोणी उचलल्या, गाडीमध्ये टाकल्याडिलिव्हरीला पण गेलो. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते,असे म्हणाले. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला असते. ती कला शिकण्याचा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करातेच तेच करू नका, मैत्री व्यवसायात यश देते तर यश देते तर शत्रुत्व व्यवसायात मागे नेते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. सर्व धर्माचा भाषांचा आदर करा, असा मोलाचा सल्ला डॉ. धनंजय दातार यांनी दिला. व्यावसायिक कौशल्य सांगतानाच त्यांनी व्यवसायातील यशाचे गमकही समजावून सांगितले.
ते म्हणाले की, धंद्यामध्ये टर्नओव्हर पेक्षा प्रॉफिट किती आहे हे जास्त महत्वाचे असते. १० कोटी टर्नओव्हरच्या धंद्यामध्ये जास्त प्रॉफिट असेल आणि १०० कोटींच्या धंद्यामध्ये कमी प्रॉफिट असेल तर १० कोटींचा धंदा केव्हाव्ही चांगला. कोणताही धंदा करा त्यामध्ये प्रॉफिट असला पाहिजे. कोणताही बॅण्ड कचरा करून विकू नका. कोणताही ड्रड तुम्ही तयार करत आहात. त्यावर मेहनत करत आहेत तर त्याची योग्य किमंत मिळाली पाहिजे, हे घ्या. फार मोठा टर्न ओव्हर असूनही कमी प्रॉफिटमुळे फार मोठी उंची गाठूनही उद्योग कोसळण्याचा धोका असतो, याची जाणीव त्यांनी करून दिली. कोणत्याही धंद्यात लगेच यश येत नाही. त्यासाठी जवळपास तीन वर्ष लागतात. धंदा व्यवसायात दररोज अडचणी येत असतात. त्यापैकी५टक्के अडचणी सुटतात मात्र ९५ टक्के अडचणींवर स्वत:ला मात करावी लागते. त्यामुळे कोणताही धंदा व्यवसाय करताना संयम बाळगण्याची तसेच याबाबत कुटुंबियांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे डॉ. दातार यांनी सांगितले. ज्यावेळी तुम्ही चिडता त्यावेळी कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवता. त्यामुळे धंद्यामध्ये जिद्द नव्हे तर चीड असली पाहिजे. त्यावेळी माणूस जरूर यशस्वी होतो. त्याच्यासमोर कितीही अडचणी आली तरी मागे हटत नाही. लहानपणी एका लग्नाच्या पंगतीतुन ही व्हीआयपी पंगत असल्याचे सांगून डॉ. दातार यांना उठविण्यात आले होते. त्याचवेळी एक दिवस खूप श्रीमंत होण्याचं मी ठरवलं. या चिडीतून मसाल्याच्या व्यवसायात आपण इतके पुढे गेलो कि आखाती देशांमध्ये टॉप १०० रिचेस्ट लोकांमध्ये माझा १४ वा क्रमांक असल्याचे सांगून कोणताही धंदा लक्षपूर्वक केल्यास यश नक्की मिळणार हे त्यांनी सांगितले. उद्योग व्यवसायात नाव कमवायला वेळ लागतो. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करा, बॅण्डचा कचरा करू नका, दर्जा कायम ठेवा, असा महत्वाचा सल्ला त्यांनी व्यवसायिकांना दिला. धंदा व्यवसायात झोकून देताना आरोग्याची काळजी घ्या,असा सल्ला द्यायलाही डॉ. दातार विसरले नाहीत. शाश्वत ग्रुपच्या वतीने लक्ष्मण विसपुते यांनी डॉ. धंनजय दातार यांचे स्वागत केले. चिंतामणी क्रिएशन्सचे निमेश जनवाड यांनी आभारप्रदर्शन तर ख्यातनाम वृत्त निवेदक भूषण करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.