आली निवडणक..आता होऊद्या खर्च

अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगर परिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी इच्छकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचे प्रयत्न होत आहेत. संभाव्य प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत आपण मागे दीले टावतायनाटात अनेक इच्छुक उमेदवार कार्यक्रमांच्या माध्यमातन मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वारेमाप खर्च करू लागले असल्याची जोरदार चर्चा होत आहे. अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण प्रभाग आरक्षण सोडत झाल्यानंतर असेल हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेले इच्छुक उमेदवार अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. या मंडळींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचे प्रयत्न सरु केले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून तसेच सामाजिक मानाच्या माध्यमातनही असा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अलीकडेच जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने शहरात भागाभागात विविध कार्यक्रमांचे. महिला सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. काही इच्छक उमेदवारांमध्ये या निमित्ताने महिलांना साड्या व इतर भेटवस्तू देण्याचीही स्पर्धा रंगल्याचे चित्र काही प्रभागात दिसत होते. होळी दहन कार्यक्रमाला इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्याशिवाय सोशल मीडियावरही इच्छुक उमेदवारांचा मुक्त संचार होऊ लागला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये कोणताही एखादा दिवस राहिला नसेल, ज्या दिवसाचे दिनविशेष शोधून इच्छुक उमेदवारांनी शुभेच्छा दिल्या नसतील. अशी परिस्थिती आहे. जनसंपर्क वाढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा हा प्रयत्न आहे. त्यात अनेक विद्यमान नगरसेवक, राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकत्यांचा तसेच आतापर्यत कोणत्याही सामाजिक कार्यात न दिसलेल्या स्वयंघोषित समाज सेवकांचाही समावेश आहे. गेल्या वर्ष दोन वर्षातही हे दिन होतेच पण त्यावेळी या दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात एवढा उत्साह दिसत नव्हता. यंदा मात्र हा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग उधळू लागल्याचे हे चित्र असल्याचे शहरातील राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाली असली तरी अद्याप पुढील क जाहीर झालेला नाही. त्यातच निवडणुकीची तारीख लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याची चर्चाही शहरातील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकीची तारीख केव्हा जाहीर होणार याकडे इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले आहेत.